आज दि. १ जुलै. दरवर्षी हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा होतो. या निमित्ताने डॉक्टरांच्या आजच्या सामाजिक स्थिती
व स्थान याविषयी गांभिर्याने चिंतन करणे जरुरी आहे. डॉक्टरांच्या विविध विषयांसाठी
इंडियन मेडिकल असोशिएशन ही संघटना काम करीत आहे. याच संघटनेच्या नेतृत्वात दि. ६
जूनला दिल्लीत ३० हजारावर डॉक्टर्स गोळा झाले. त्यांनी त्यांच्या अपेक्षा केंद्र
सरकारसमोर व्यक्त केल्या. यात मुख्य मागणी ही डॉक्टरांवर रुग्णाचे नातेवाईक
यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून कायदेशीर संरक्षण ही आहे. यासाठी दि. १८ ऑगस्टपर्यंतचा वेळ सरकारला
दिला आहे. तोपर्यंत सकारात्मक काही घडले नाही तर दि. १८ ऑगस्टपासून देशातील
डॉक्टर बेमुदत संपावर जातील. डॉक्टरांचा हा लढा एक प्रकारे डॉक्टरांशी युध्द
करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आहे.
