Saturday, 3 December 2016

१७ वर्षांची आनंदयात्रा ...

विश्वप्रभा हॉस्पिटलच्या प्रवासाला आज (दि. ३ डिसेंबर २०१६) १७ वर्षे पूर्ण झाली. हॉस्पिटलचा प्रवास १८ व्या वर्षांत सुरू झाला. माझ्या व डॉ. सिमाच्या वैद्यकिय सेवेचा प्रवासही १९ व्या वर्षाकडे निघाला आहे. विश्वप्रभा सुरू करण्यापूर्वी मी सिव्हील हॉस्पिटल व स्वातंत्र्य चौकातील डॉ. दिलीप चव्हाण यांच्या जागेत जवळपास वर्षभर वैद्यकिय सेवा दिली होती. आतापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी एक आनंदयात्राच आहे.

Wednesday, 19 October 2016

रोटरीचा कृत्रिम हाताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प



रोटरी क्लब ही जगभरातील गरजू समाजासाठी विविध प्रकारचे कार्य करणारी संस्था आहे. रोटरीचे प्रकल्प हे समाजात सध्या कोणत्या प्रकारचे सहाय्य हवे याचा विचार करुन राबविले जातात. त्यामुळे अशा प्रकल्पातून गरजुंसाठी थेट लाभाच्या अनेक योजना राबविल्या जावून त्या उपयुक्त ठरतात. यावर्षी रोटरी इंटर नॅशनलने मानवतेच्या सेवेत रोटरी अर्थात 'Rotary serving humanity ' हे ब्रीद घेतले आहे. जगभरातील सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करता येईल, याचा विचार करुन काही उपक्रमांची आखणी केली आहे. त्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा गरजुंना (दिव्यांगांना) कृत्रिम हात पुरविण्याचा आहे. त्या अंतर्गत रोटरी क्लब जळगाव वेस्टने पहिले शिबिर यशस्वीपणे पार पाडले.

Friday, 30 September 2016

मराठा संघटन जाणार कोणत्या दिशेला ?


कोपर्डी येथील मुलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील मराठा समाज हा मराठा क्रांती मोर्चानंतर संघटन पातळीवर एकत्र आला आहे. पहिला मोर्चा औरंगाबादमध्ये निघाला. त्यानंतर बीड, आणि जळगाव येथेही मोर्चाचे आयोजन झाले. तेव्हा मोर्चातील गर्दी एक आकडी संख्येत होती. मात्र गेल्या काही दिवसात परभणी, लातुर, जालना, नगर, नाशिक, पुणे, धुळे या पाठोपाठ निघालेल्या सर्व मोर्चातील गर्दी ही प्रचंड, अति प्रचंड या शब्दांच्याही पलिकडे गेली आहे. मराठा संघटन मजबूत होत असून समाज म्हणून सर्वांची एका झेंड्याखाली येण्याची मानसिकता यातून दिसत आहे. वीस, तीस लाखांचे आकडे पार करीत आता मुंबईतील मोर्चा १ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. हा सारा प्रकार जनआंदोलनांच्या व्याख्या बदलणारा असून मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक आंदोलनांच्या परिभाषा, स्वरुप बदलून टाकले आहे. याचा एक मराठा म्हणून मला निश्चित आनंद व सार्थ अभिमान आहे. 

Wednesday, 31 August 2016

मराठा क्रांती मोर्चानंतर पुढे काय ?



जळगाव जिल्ह्याच्या आंदोलनांच्या इतिहासातील न भुतो न भविष्यतीअसा मराठा क्रांती मोर्चा दि. २९ ऑगस्टला जळगाव शहरात निघाला. कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे तिची झालेली हत्या या पार्श्वभूमिवर या मोर्चाचे आयोजन औरंगाबाद पॅटर्ननुसार करण्यात आले होते. मोर्चात सव्वा लाख की दीड लाख की दोन लाख लोक सहभागी झाले यावर अंदाज बांधले जात आहेत. माझ्या मते खरेतर हा मुद्दा समाजाची पुढील दिशा भरकटवणारा आहे. कारण, मराठा समाज संयम राखत एकत्र येतो, ते सुद्धा पदरचे पैसे खर्च करून आणि समाजाचे एकत्रिकरण दाखविण्यासाठी वेळ देतो हिच खरी क्रांती आहे.

Wednesday, 24 August 2016

मराठा समाजाचा मूक एल्गार – मराठा क्रांती मोर्चा

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर दि. १३ जुलैला झालेल्या अत्याचार व त्यानंतर क्रूरपणे खुनाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील समाजमन गहिवरून निघाले आहे. विविध प्रकारच्या गट-तट, राजयकिय पक्ष, संघटना, ब्रिगेड आदींमध्ये विभागलेला मराठा समाज सर्व मान-अपमानाच्या भींती व मन-मतभेद झुगारुन एकत्र येत आहे. अत्याचारपिडीत मुलीला किमान मृत्यूनंतर न्याय मिळवून देण्यासाठी मराठा समाजाने मूकमोर्चा मार्गाने सुरू केलेला एल्गार आता समाजाचे एकत्रिकरणाचे माध्यम होवू पाहात आहे. याच माध्यमातून समाजासाठी आरक्षण व इतर राजकिय, सामाजिक प्रश्न सोडविण्याची संधीही उपलब्ध होवू शकेल.

Monday, 25 July 2016

रोटरीचे लक्ष्य साध्य करणार !


१ जुलै २०१६ पासून रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चा उपप्रांतपाल म्हणून मी जबाबदारी सांभाळली आहे. रोटरीच्या या डिस्ट्रिक्टमध्ये नाशिकपासून तर गोंदिया (विदर्भ) पर्यंतचे जिल्हे समाविष्ट आहेत. यात १०० रोटरी क्लब असून वर्धा येथील प्रांतपाल श्री. महेश मोकालकर यांच्या नेतृत्वात २२ उपप्रांतपाल काम करीत आहेत. माझ्याकडे जळगाव शहरातील गोल्डसिटी, मिडटाऊन आणि जळगाव वेस्टसह अमळनेर क्लब, भुसावळ रेलसिटी अशा पाच क्लबची जबाबदारी आहे.

Sunday, 26 June 2016

सोनोग्राफीचा सावळा गोंधळ


आजच्या अत्याधुनिक उपचार पद्धतीत सोनोग्राफी हे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी वरदान आहे. शरीराच्या आतील कोणत्याही प्रकारचे बदल, व्याधी याविषयी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नेमकी माहिती मिळवून देण्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग करता येतो. मात्र, गर्भ लिंग तपासणी आणि नंतर मुलीचा गर्भ काढून टाकण्यासाठी सोनोग्राफीच्या गैरवापराची काही प्रकरणे समोर आली. ही बाब लक्षात घेवून सरकारने सोनोग्राफी तंत्र वापरासाठी अनेक प्रकारचे निर्बंध संबंधित डॉक्टरांवर टाकले आहेत. या निर्बंधांच्या सोयीच्या व मनमानी अंमलबजावणीमुळे अनेक डॉक्टर सध्या अडचणीत आहेत. सोनोग्राफी विषयीचा हा सावळा गोंधळ वैद्यकिय क्षेत्रात अस्वस्थता व अशांतता निर्माण करणारा आहे.

Thursday, 2 June 2016

"मराठा-मंगल" ... विवाह पद्धतीत प्रबोधनाचा वसा !!

मराठा मंगल च्या मोबाईल व्हॅनचे लोकार्पण

महाविद्यालयीन जिवनापासून मला स्वतःला काही ना काही काम लावून घ्यायची सवय आहे. डॉक्टरांचे संघटन असेल, रोटरी क्लब असेल किंवा इतर सामाजिक संघटना असतील त्यांच्यासोबत विविध समाजोपयोगी उपक्रमात सक्रीय सहभागी व्हायला मला आवडते. आपण समाजात राहतो, समाजासाठी व्यवसाय करतो, समाजाकडून काही तरी मिळवतो मग, त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतोहा माझा व्यक्तिगत कृतीसंकल्प आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी आणि माझे सहकारी तथा माहिती क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आर. बी. नाना पाटील मिळून मराठा मंगलया नावाने मराठा समाजातील विवाह व प्रबोधन स्वयंसेवी संस्थेच्या कामाला आम्ही प्रारंभ केला आहे.

Friday, 20 May 2016

सिव्हील हॉस्पिटलमध्ये "रोटरी निओ केअर सेंटर"


रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचा अध्यक्ष असताना मी दोन चिरकाल स्मरण राहतील असे उपक्रम केले. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतची दोन उपयुक्त कामे त्यावेळी खूप चर्चेत राहिली. वृत्तपत्रांनी त्यावेळी या दोन्ही उपक्रमांना भरभरून प्रसिद्धी दिली. अमरधामजवळ विसावा बांधण्यासाठी मी आणि क्लबचे सचिव किरण कक्कड अशा दोघांनी निधी खर्च केला होता. मात्र, त्यापूर्वी केलेल्या एका कार्यासाठी रोटरी इंटरनॅशनलचा सुमारे १५ लाखांचा निधी पहिल्यांदा जळगाव रोटरी वेस्ट क्लबला मिळाला.

Wednesday, 4 May 2016

वैकुंठधाम जवळील "विसावा"...

विश्वप्रभा हॉस्पिटलचा विस्तार टप्प्याटप्याने होत गेला. संपूर्ण जिल्हाभरातून रुग्णांची संख्या वाढू लागली. नेहमीचे काम करीत असताना
वैद्यकिय संघटनेच्या सोबतच इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, संघटनांशीही माझा संपर्क येवू लागला. सामाजिक व सार्वजनिक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीने कार्याच्या विस्तारासाठी अशा संस्थांमध्ये सहभागी होणे किंवा त्यात पदाधिकारी होवून सामाजिक उपक्रामांची जबाबदारी स्वीकारणे ही सुद्धा संधी असते. तशी संधी मलाही मिळाली होती. मी रोटरी जळगाव (वेस्ट) क्लबचा अध्यक्ष झालो होतो. 

Friday, 22 April 2016

लहान मुलांसह मातांना उन्हाळ्यात लग्न कार्यात बंदी हवी....

 

नमस्कार मित्रांनो

लहान मुलांच्या वैद्यकिय सेवेचा गेल्या अनेक वर्षांचा माझा अनुभव डोळ्यांसमोर ठेवून मी आज थोडा वेगळा आणि बंडखोर मुद्दा चर्चेत मांडणार आहे. सध्या एप्रिल महिना मध्यावर आहे. तापमान ४५ अंशापर्यंत आले आहे, अजून मे महिना जायचा आहे. आमच्या विशवप्रभा हास्पिटलमध्ये उन्हाळ्याच्या प्रांरभापासून नवजात शिशुंसह पाचवर्षे वयोगटातील अनेक लहान मुले उष्माघाताच्या आजारावर उपचारासाठी दाखल होतात. याशिवाय, उन्हाळ्यातील विषमज्वर, अतिसार, काविळीचे बालरुग्णही मोठ्या संख्येत दाखल होतात. गोवर, कांजण्यांचेही रुग्ण असतात. अशावेळी बालरुग्णांवर अत्यंत काळजीपूर्वक उपचार करावे लागतात. बऱ्याचवेळा पालकांच्या थोड्या दुर्लक्षामुळे आजार बळावतात. हातात असलेली स्थिती हाताबाहेर जाते.

Tuesday, 5 April 2016

"मेडिबीटस्" चे सुमधुर तराणे

डॉ. राजेश पाटील आणि डॉ. रेशमा उपाध्ये
जळगाव शहरात खासगी वैद्यकीय सेवा देणारे अनेक डॉक्टर्स विविध प्रकारचे छंद जोपासतात. बहुतांश कला रसिक आहेत. नृत्य, कला, संगीत, संकलन अशी वेगळ्या प्रांतात अनेकांची मुशाफरी आहे. याच छंदाचा एक धागा अनेकांना एकत्र आणणारा ठरला आहे. चित्रपट गीते किंवा सुगम संगीत गाणाऱ्या डॉक्टर मंडळी एकत्र येवून "मेडिबीटस्" हा सुमधुर आणि कर्ण प्रिय गाण्यांची मेजवानी देणारा अॉर्केस्ट्रा अस्तित्वात आणला आहे. या अॉर्केस्ट्राची निर्मिती आणि प्रवास याचीही ऐकावी अशी रंजक कहाणी आहे.
मी लोणी येथे एमबीबीएसला असताना कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये गाणी गायचो. किशोरकुमार आवडता गायक. त्याच्या आवाजात गायचा प्रयत्न करायचो. मित्रांना गाणे आवडायचे. ते प्रोत्साहन द्यायचे. नंतर जळगावला मी आणि सौ. सिमाने विश्वप्रभा हॉस्पिटलचा व्याप वाढवला. गाण्याचा छंद मागे रेंगाळला. एक दोन वर्षानंतर व्यवसायात थोड स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा गाणे डोक्यात घुसले. सन २००१/२००२ च्या सुमारास जळगाव शहरात आरोग्यसेवा देणाऱ्या विविध डॉक्टरांचे आगमन होत होते. त्यांच्यातही गाण्यांची आवड असलेली मंडळी होती. एकेदिवशी डॉ. जयंती चौधरी यांच्याकडे मी आणि डॉ. अटल बसलो होतो. तेव्हा डॉक्टरांमधील गायकांचा विषय चर्चेत आला. तेव्हा प्राथमिकस्तरावर ठरले की, गाणाऱ्या डॉक्टरांना एकत्र आणायचे.

सर्वश्री डॉक्टर हेमंत केळकर, श्रीश्रीमाळ, दीपक आठवले, मिलींद राणे, धनंजय बोरोले, रणजित चव्हाण असे अनेकजण एकत्र आलो. डॉक्टरांचा अॉर्केस्ट्रा करायचा हा निर्णय झाला. त्याला साजेसे "मेडिबीटस्" हे समर्पक नाव मी सूचविले. तेव्हा आएमए जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. सरुप लोढा व सचिव डॉ. दीपक पाटील होते. त्यांनीही कल्पना उचलून धरली आणि डॉक्टरांच्या "मेडिबीटस्" चा पहिला कार्यक्रम जळगाव जिल्हा बँकेच्या जे. एस. अप्पा पाटील सभागृहात करण्याचे ठरले. डॉ. सुभाष चौधरी, डॉ. सुदर्शन नवाल, डाॅ. कडुसकर यांच्यासारख्या अनेक जेष्ठ मंडळींचे प्रोत्साहन मोलाच ठरले.

अॉर्केस्ट्रा करायचा म्हटल्यावर संगीत आले. आमच्यात वाद्ये वाजविणारे नव्हते. आम्ही जळगावातील ज्येष्ठ संगीतकर्मी अप्पा नेवेंशी संपर्क केला. त्यांनी गाणी बसविण्याची जबाबदारी स्वीकारली. मग सराव सुरु झाला. एकेकाच्या सहभागाने उत्साह वाढला. कार्यक्रमाचे संयोजन विविधांगाने फुलू लागले. गाण्याच्या सरावासाठी हॉस्पिटलचे काम संपवून रोज रात्री साडेआठ/ नऊला गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील म्युझिक स्टेशनवर गायक डॉक्टर मंडळी जमू लागली. कधी कोणाकडून चहा तर कोणाकडून बिस्कीट मिळत. त्या  १०/१२ रात्री उशीरापर्यंत धम्माल असायची. आज ही डोळ्यांसमोर प्रसंग तरळून जातात.

"मेडिबीटस्" चा पहिला कार्यक्रम ठरलेल्या रात्री मोठ्या धूमधडाक्यात झाला. रसिकांच्या उत्सुकतेने आणि उपस्थितीमुळे सभागृह तुडूंब भरले होते. प्रत्यक्ष रंगमंचावर डॉक्टरांमधील अनेक हरहुन्नरी कलावंत समोर आले. डॉ. बगडीया यांनी शब्दांवर प्रभुत्व दाखवत शेरोशायरी सादर केली. डॉ. अटल यांनी बहारदार चारोळ्या सादर केल्या. डॉ. ज्योती गाजरे यांनी छोटे-छोटे किस्से सांगितले. गायक डॉक्टरांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या यशस्वी कार्यक्रमानंतर "मेडिबीटस्" चा उत्साह दुणावला. काही नवे कलावंत आमच्याशी जोडले गेले. त्यात सौ. अलका दिलीप चव्हाण, डॉ. रेशमा उपाध्ये, डाॅ. अजय शास्त्री व सौ. शास्त्री, डाॅ. उदयसिंह पाटील, डाॅ. राजेश जैन, डाॅ. विद्याधर दातार यांचा सहभाग होता. विशेष म्हणजे तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे व जिल्हाधिकारी डाॅ. संजीव मुखर्जी यांनी देखील दुसऱ्या वर्षाच्या "मेडिबीटस्" मध्ये स्वयंस्फूर्तीने गाणी सादर केली.

डॉक्टर मंडळी गाणी म्हणतात, याची नवी क्रेझ निर्माण झाली. "मेडिबीटस्" कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. दरम्यानच्या काळात त्सुनामीचा कहर झाला. आपदग्रस्तांना मदतीसाठी "मेडिबीटस्" चा कार्यक्रम करायचे ठरले. या कार्यक्रमास तिकीट लावले. आश्चर्य म्हणजे रसिकांनी एवढा प्रतिसाद दिला की, दीड लाखांचा धनदेश "आयएमए"ने त्सुनामीग्रस्तांसाठी मदत म्हणून दिला.

नंतरच्या काळात "मेडिबीटस" पाचोरा येथेही सादर झाले. दरवर्षी "मेडिबीटस्" सादर करण्याची परंपरा निर्माण झाली.  या कार्यक्रमामुळे डॉक्टर मंडळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सर्वजण सहकुटूंब एकत्र येवू लागले. २-३ वर्षानंतर भुसावळची काही उत्साही डाॅक्टर मंडळी देखील "मेडिबीटस्" मध्ये सहभागी होवू लागले. यात डाॅ. दावलभक्त, दिनेश नेहते, जान्हवी पाटील, डाॅ. सौ. अत्तरदे, डाॅ, केळकर दाम्पत्य यांचा समावेश होता. इतरही डाॅक्टर गाणी ऐकण्यास नियमित येऊ लागली.

सन २००४ च्या सुमारास एक संधी चालून आली. "आयएमए"ने राष्ट्रीयस्तरावर डॉक्टर मंडळींसाठी गाण्याची स्पर्धा ठेवली होती.  प्रत्येक आयएमएकडून ३ एन्ट्री कॅसेटमध्ये रेकाॅर्ड करुन मागविली होती. महाराष्ट्रातील गाण्यांची छाननी पुण्यात होती. एकल गीत आणि द्वंद्व गीत म्हणायचे होते. मी, डॉ. हेमंत केळकर व डॉ. रेशमा उपाध्ये आम्ही सहभाग घेतला. पुण्याच्या परिक्षकांनी कैसेटमधील गाणी ऐकून माझी आणि डॉ. उपाध्ये यांची द्वंद्व गितासाठी आणि डाॅ. रेशमाची एकल गितासाठी निवड केली. महाराष्ट्र चमुत आम्ही क्रमांक ३ वर होतो. लता-किशोरच्या आवाजातील "हाल कैसा है जनाब का?" हे गाणे आम्ही निवडले होते. अप्पा नेवेंनी कसून सराव करून घेतला होता. अखेर फायनल राऊंडसाठी आम्ही अहमदाबादला रवाना झालो.

अहमदाबादमध्ये जोरदार चुरस होती. हरिद्वार, मेरठ, गाझीयाबाद, चंदीगड, नगर, यवतमाळ, दिल्ली आदी ठिकाणचे संघ होते. पहिला दिवस सरावाचा होता. मी आणि डॉ. उपाध्ये आम्ही इतरांचा अंदाज घेतला. दुसऱ्या दिवशी टागोर सभागृहात फायनल स्पर्धा होती. सभागृह अगदी पॉश, चकाचक होते. नावाजलेले तीन परिक्षक होते. आम्ही दडपण न घेता गायचे ठरविले. तसेच गायलो आणि जागेवर बसलो. निकालाची उत्सुकता होती पण आपण विजेते होवू हा विश्वास नव्हता. परिक्षकांनी निकाल वाचला आणि कानावर विश्वास बसणार नाही असा निकाल ऐकू आला. मला व डॉ. रेशमा उपाध्ये यांना राष्ट्रीयस्तरावर गाण्याचे पहिले पारितोषिक जाहीर झाले. आम्ही स्वप्नवत वातावरणात पारितोषिक स्वीकारले. तेव्हा मोबाईल फोनवरून स्टेजवरुनच जळगावी डाॅ. हेमंत केळकरांना निकाल सांगितला. दुसऱ्या दिवशी जळगाव रेल्वेस्थानकावर उतरलो तेव्हा अनेक मित्र अभिनंदनासाठी आले होते. प्रेस फोटोग्राफर शब्बीर सय्यद तेथे होते. त्यांनी ट्रॉफीसह आम्हा दोघांचा फोटो दै. सकाळ पान १ वर प्रसिध्द केला. त्यानंतर जळगाव "आयएमए" ने सत्कार केला. "महाराष्ट्र आयएमए" ने महाबळेश्वर येथील कॉन्फरन्समध्ये मला व डॉ. उपाध्ये यांना खास निमंत्रण देवून बोलावले. आमचा जंगी सत्कार केला. यावेळेस डॉ. सतीश गुप्ता योगायोगाने महाबळेश्वरात होते. त्यांनी आमच्या सन्मानार्थ खास डिनरचे आमंत्रण दिले. ते दिवस आमच्यासाठी "सोन्याचे दिवस" होते. आजही त्या आठवणी मनाला प्रसन्न करतात.

"मेडिबीटस्" ने मला गायक म्हणून ओळख दिली. नंतर अनेक कार्यक्रमात एखाद-दुसरे गाणे म्हणायची संधी मिळाली. अप्पा नेवे, मोहनजी तायडे आदी संगीत क्षेत्रातील मंडळी इतरत्र बोलावतात रफी, मुकेश, किशोर, मन्नाडे, आर. डी. बर्मन आदींच्या स्मृतीनिमित्त होणाऱ्या गायन कार्यक्रमात माझा सहभाग असतोच. रोजच्या त्याच त्या कामात गायकीने मला विरंगुळा, आराम दिला. एक "स्पीड ब्रेकर" चे काम हा छंद करतो. शक्यतो मी गाण्याची संधी नाकारत नाही. दरम्यानच्या काळात  रोटरी क्लबच्या "रोटो स्पोटर्स २०११" मध्ये मला सर्वोत्तम गायकाचा पुरस्कार मिळाला.

अलिकडे काही वर्षांपासून "मेडिबीटस्" चे संयोजन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात होते. काही नवीन डाॅक्टर गायक देखील चांगला सहभाग घेतात. बहुधा शहराबाहेर लांब आयोजन होत असल्यामुळे जुन्यातील अनेकांचा सहभाग कमी असतो. मात्र, मेडिकल काॅलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असतात."मेडिबीटस्" च्या आठवणी म्हणजे आयुष्यातील सुमधूर तराणेच आहे.

थांबू या. पुन्हा भेट नव्या विषयासह...!" 

Saturday, 19 March 2016

पेशंटच्या तोंडूनच प्रचार ... प्रसार !

डॉक्टरांच्या मेडिबीट्स अॉर्केस्ट्रात गाताना डॉ. राजेश पाटील
विश्वप्रभा हॉस्पिटल हे महिला आणि शिशुंच्या सेवेत  दि. ३ डिसेंबर १९९९ पासून रुजू झाले. त्या काळात जळगाव शहरात बालरोगतज्ञ डॉक्टरांची संख्या जवळपास बारा होती. मी तेरावा होतो. बालरोगतज्ञांचे आपापसात तसे संघटन नव्हते. फारसे एकत्र येणेही नव्हते. सेवा किंवा व्यवसायाच्या स्पर्धेतून परिचय आणि सख्यही नव्हते. बालरोग क्षेत्रातच मलाही काम करायचे असल्याने मी इतर ज्येष्ठ आणि जुन्या बालरोगतज्ञांच्या भेटी गाठीला जावू लागलो. ते पेशंट तपासत असत मी मात्र गप्पा मारत असे. आपापसातील नेहमी सकारात्मक गोष्टीच मी परस्परांना सांगत असे. यातूनच बालरोगतज्ञांची संघटना सुरु करायच्या सहमतीवर एकमत झाले. इंडियन अॅकेडेमी अॉफ पेडीयाट्रीकची (IAP) जळगाव शाखा स्थापन करण्याचे ठरले. या संघटनचा पहिला हेतू केवळ महिन्यातून एकदा एकत्र येवून भेटणे व सोबत जेवणे एवढाच होता. अशा रितीने संघटन उभे राहीले.

Sunday, 13 March 2016

... आणि वडील म्हणाले ॲप्रुव्हड !!!

रामराम मंडळी.

डॉ. सौ. सीमा आणि डॉ. राजेश
आजपासून आपण आठड्यातून एकदा नक्की भेटू. जगाच्या या कट्ट्यावर मीपण गप्पा मारायला येतोय. माझ्या जडण-घडणीचा प्रवास मी आनंदयात्रा या सदरातून सांगणार आहे. माझ्या गप्पा म्हणजे आत्मकथा नाही. कधी स्वतःविषयी, कधी कुटुंबाविषयी तर कधी समाजाविषयी, आमच्या आरोग्य आणि वैद्यकिय सेवा या विषयी आपणाशी बोलणार आहे. कारण गावाकडील आमच्या मोठ्या पाटील कुटुंबातील मी पहिला डॉक्टर.