कोपर्डी येथील मुलीवर
अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील मराठा समाज हा मराठा क्रांती मोर्चानंतर संघटन
पातळीवर एकत्र आला आहे. पहिला मोर्चा औरंगाबादमध्ये निघाला. त्यानंतर बीड, आणि जळगाव येथेही मोर्चाचे आयोजन झाले. तेव्हा मोर्चातील
गर्दी एक आकडी संख्येत होती. मात्र गेल्या काही दिवसात परभणी, लातुर, जालना,
नगर,
नाशिक, पुणे, धुळे या पाठोपाठ निघालेल्या सर्व मोर्चातील गर्दी ही प्रचंड,
अति प्रचंड या शब्दांच्याही पलिकडे गेली आहे.
मराठा संघटन मजबूत होत असून समाज म्हणून सर्वांची एका झेंड्याखाली येण्याची
मानसिकता यातून दिसत आहे. वीस, तीस
लाखांचे आकडे पार करीत आता मुंबईतील मोर्चा १ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. हा
सारा प्रकार जनआंदोलनांच्या व्याख्या बदलणारा असून मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक
आंदोलनांच्या परिभाषा, स्वरुप बदलून टाकले आहे.
याचा एक मराठा म्हणून मला निश्चित आनंद व सार्थ अभिमान आहे.
