Thursday, 29 June 2017

डॉक्टरांशी युद्ध करणारा भारत एकमेव देश !

ज दि. १ जुलै. दरवर्षी हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा होतो. या निमित्ताने डॉक्टरांच्या आजच्या सामाजिक स्थिती व स्थान याविषयी गांभिर्याने चिंतन करणे जरुरी आहे. डॉक्टरांच्या विविध विषयांसाठी इंडियन मेडिकल असोशिएशन ही संघटना काम करीत आहे. याच संघटनेच्या नेतृत्वात दि. ६ जूनला दिल्लीत ३० हजारावर डॉक्टर्स गोळा झाले. त्यांनी त्यांच्या अपेक्षा केंद्र सरकारसमोर व्यक्त केल्या. यात मुख्य मागणी ही डॉक्टरांवर रुग्णाचे नातेवाईक यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून कायदेशीर संरक्षण ही आहे. यासाठी दि. १८ गस्टपर्यंतचा वेळ सरकारला दिला आहे. तोपर्यंत सकारात्मक काही घडले नाही तर दि. १८ गस्टपासून देशातील डॉक्टर बेमुदत संपावर जातील. डॉक्टरांचा हा लढा एक प्रकारे डॉक्टरांशी युध्द करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आहे.

Friday, 5 May 2017

मंगल विवाह एक दैवी अनुभव


 
अमरावतीचे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची मूकबधीर मानसकन्या मंगल आणि रावेर येथील देविदास जैन यांचे मूकबधिर चिरंजीव योगेश यांचा मंगल विवाह सोहळा जळगाव येथे दि. ३० एप्रिल २०१७ ला अत्यंत उत्साहात पार पडला. या राष्ट्रीय मंगल विवाह सोहळ्याचे आयोजक रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट होते. हा अनोखा विवाह सोहळा जळगावच्या संपूर्ण रोटरी परिवाराने आपल्या घरचे कार्य म्हणून उत्साहाने साजरा केला. या विवाह सोहळ्याचा प्रकल्प प्रमुख म्हणून गेले महिनाभर मी काम करीत होतो. माझी भूमिका एक प्रकारे शंकरबाबा यांची १९ वी कन्या चि. सौ. कां. मंगला हिच्या पालकाचीच होती. त्यामुळे प्रत्येक काम व जबाबदारी वधुचा पिता म्हणूनच मी पार पाडली. हा विवाह सोहळा झाल्यानंतर मला एक दैवी अनुभव प्राप्त झाल्यासारखे वाटते आहे.

Monday, 16 January 2017

स्वतःसोबत दुसऱ्यांसाठी जगा ...

'रोटरी ' म्हणजे, जगाला सामाजिक सेवेचा वसा देणारी आंतरराष्ट्रीय संस्था. माझ्यासह लाखो लोकांना या संघटनचा सदस्य, पदाधिकारी असल्याबद्दल नक्कीच अभिमान आहे. गेल्या काही वर्षांत रोटरी संघटन समाजातील अगदी छोट्यातील छोट्या घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करीत आहे. रोटरीअंतर्गत सतत होणाऱ्या चर्चा, बैठका, सभांमधून सामाजिक कार्याची दिशा बदलते आहे. रोटरी आता गाव, पाड्यांवर पोहचली आहे. त्यामुळे समाजातील अशा घटकांसाठी कार्य करण्याची जबाबदारी रोटरीवर वाढते आहे.