जळगाव जिल्ह्याच्या
आंदोलनांच्या इतिहासातील “न भुतो
न भविष्यती” असा मराठा क्रांती मोर्चा
दि. २९ ऑगस्टला जळगाव शहरात निघाला. कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचार आणि
नंतर निर्घृणपणे तिची झालेली हत्या या पार्श्वभूमिवर या मोर्चाचे आयोजन औरंगाबाद
पॅटर्ननुसार करण्यात आले होते. मोर्चात सव्वा लाख की दीड लाख की दोन लाख लोक
सहभागी झाले यावर अंदाज बांधले जात आहेत. माझ्या मते खरेतर हा मुद्दा समाजाची
पुढील दिशा भरकटवणारा आहे. कारण, मराठा
समाज संयम राखत एकत्र येतो, ते
सुद्धा पदरचे पैसे खर्च करून आणि समाजाचे एकत्रिकरण दाखविण्यासाठी वेळ देतो हिच खरी
क्रांती आहे.
Wednesday, 31 August 2016
Wednesday, 24 August 2016
मराठा समाजाचा मूक एल्गार – मराठा क्रांती मोर्चा
कर्जत तालुक्यातील कोपर्डी
येथील मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर दि. १३ जुलैला झालेल्या अत्याचार व त्यानंतर
क्रूरपणे खुनाच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील समाजमन गहिवरून निघाले आहे. विविध
प्रकारच्या गट-तट, राजयकिय पक्ष, संघटना, ब्रिगेड
आदींमध्ये विभागलेला मराठा समाज सर्व मान-अपमानाच्या भींती व मन-मतभेद झुगारुन
एकत्र येत आहे. अत्याचारपिडीत मुलीला किमान मृत्यूनंतर न्याय मिळवून देण्यासाठी
मराठा समाजाने मूकमोर्चा मार्गाने सुरू केलेला एल्गार आता समाजाचे एकत्रिकरणाचे
माध्यम होवू पाहात आहे. याच माध्यमातून समाजासाठी आरक्षण व इतर राजकिय, सामाजिक प्रश्न सोडविण्याची संधीही उपलब्ध होवू
शकेल.
Subscribe to:
Posts (Atom)

