आज दि. १ जुलै. दरवर्षी हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा होतो. या निमित्ताने डॉक्टरांच्या आजच्या सामाजिक स्थिती
व स्थान याविषयी गांभिर्याने चिंतन करणे जरुरी आहे. डॉक्टरांच्या विविध विषयांसाठी
इंडियन मेडिकल असोशिएशन ही संघटना काम करीत आहे. याच संघटनेच्या नेतृत्वात दि. ६
जूनला दिल्लीत ३० हजारावर डॉक्टर्स गोळा झाले. त्यांनी त्यांच्या अपेक्षा केंद्र
सरकारसमोर व्यक्त केल्या. यात मुख्य मागणी ही डॉक्टरांवर रुग्णाचे नातेवाईक
यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून कायदेशीर संरक्षण ही आहे. यासाठी दि. १८ ऑगस्टपर्यंतचा वेळ सरकारला
दिला आहे. तोपर्यंत सकारात्मक काही घडले नाही तर दि. १८ ऑगस्टपासून देशातील
डॉक्टर बेमुदत संपावर जातील. डॉक्टरांचा हा लढा एक प्रकारे डॉक्टरांशी युध्द
करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आहे.
Thursday, 29 June 2017
Friday, 5 May 2017
मंगल विवाह एक दैवी अनुभव
Monday, 16 January 2017
स्वतःसोबत दुसऱ्यांसाठी जगा ...
'रोटरी ' म्हणजे, जगाला सामाजिक सेवेचा वसा देणारी आंतरराष्ट्रीय संस्था. माझ्यासह लाखो लोकांना
या संघटनचा सदस्य, पदाधिकारी असल्याबद्दल नक्कीच अभिमान आहे. गेल्या काही
वर्षांत रोटरी संघटन समाजातील अगदी छोट्यातील छोट्या घटकांच्या गरजा पूर्ण
करण्यासाठी कार्य करीत आहे. रोटरीअंतर्गत सतत होणाऱ्या चर्चा, बैठका, सभांमधून सामाजिक कार्याची
दिशा बदलते आहे. रोटरी आता गाव, पाड्यांवर पोहचली आहे. त्यामुळे समाजातील अशा घटकांसाठी
कार्य करण्याची जबाबदारी रोटरीवर वाढते आहे.
Saturday, 3 December 2016
१७ वर्षांची आनंदयात्रा ...
विश्वप्रभा
हॉस्पिटलच्या प्रवासाला आज (दि. ३ डिसेंबर २०१६) १७ वर्षे पूर्ण झाली. हॉस्पिटलचा
प्रवास १८ व्या वर्षांत सुरू झाला. माझ्या व डॉ. सिमाच्या वैद्यकिय सेवेचा प्रवासही १९ व्या
वर्षाकडे निघाला आहे. विश्वप्रभा सुरू करण्यापूर्वी मी सिव्हील हॉस्पिटल व
स्वातंत्र्य चौकातील डॉ. दिलीप चव्हाण यांच्या जागेत जवळपास वर्षभर वैद्यकिय सेवा
दिली होती. आतापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी एक आनंदयात्राच आहे.
Wednesday, 19 October 2016
रोटरीचा कृत्रिम हाताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
रोटरी
क्लब ही जगभरातील गरजू समाजासाठी विविध प्रकारचे कार्य करणारी संस्था आहे. रोटरीचे
प्रकल्प हे समाजात सध्या कोणत्या प्रकारचे सहाय्य हवे याचा विचार करुन राबविले
जातात. त्यामुळे अशा प्रकल्पातून गरजुंसाठी थेट लाभाच्या अनेक योजना राबविल्या
जावून त्या उपयुक्त ठरतात. यावर्षी रोटरी इंटर नॅशनलने मानवतेच्या सेवेत रोटरी
अर्थात 'Rotary serving humanity
' हे
ब्रीद घेतले आहे. जगभरातील सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करता येईल, याचा विचार करुन काही उपक्रमांची आखणी केली आहे.
त्यातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा गरजुंना (दिव्यांगांना) कृत्रिम हात
पुरविण्याचा आहे. त्या अंतर्गत रोटरी क्लब जळगाव वेस्टने पहिले शिबिर यशस्वीपणे
पार पाडले.
Friday, 30 September 2016
मराठा संघटन जाणार कोणत्या दिशेला ?
कोपर्डी येथील मुलीवर
अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील मराठा समाज हा मराठा क्रांती मोर्चानंतर संघटन
पातळीवर एकत्र आला आहे. पहिला मोर्चा औरंगाबादमध्ये निघाला. त्यानंतर बीड, आणि जळगाव येथेही मोर्चाचे आयोजन झाले. तेव्हा मोर्चातील
गर्दी एक आकडी संख्येत होती. मात्र गेल्या काही दिवसात परभणी, लातुर, जालना,
नगर,
नाशिक, पुणे, धुळे या पाठोपाठ निघालेल्या सर्व मोर्चातील गर्दी ही प्रचंड,
अति प्रचंड या शब्दांच्याही पलिकडे गेली आहे.
मराठा संघटन मजबूत होत असून समाज म्हणून सर्वांची एका झेंड्याखाली येण्याची
मानसिकता यातून दिसत आहे. वीस, तीस
लाखांचे आकडे पार करीत आता मुंबईतील मोर्चा १ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. हा
सारा प्रकार जनआंदोलनांच्या व्याख्या बदलणारा असून मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक
आंदोलनांच्या परिभाषा, स्वरुप बदलून टाकले आहे.
याचा एक मराठा म्हणून मला निश्चित आनंद व सार्थ अभिमान आहे.
Wednesday, 31 August 2016
मराठा क्रांती मोर्चानंतर पुढे काय ?
जळगाव जिल्ह्याच्या
आंदोलनांच्या इतिहासातील “न भुतो
न भविष्यती” असा मराठा क्रांती मोर्चा
दि. २९ ऑगस्टला जळगाव शहरात निघाला. कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचार आणि
नंतर निर्घृणपणे तिची झालेली हत्या या पार्श्वभूमिवर या मोर्चाचे आयोजन औरंगाबाद
पॅटर्ननुसार करण्यात आले होते. मोर्चात सव्वा लाख की दीड लाख की दोन लाख लोक
सहभागी झाले यावर अंदाज बांधले जात आहेत. माझ्या मते खरेतर हा मुद्दा समाजाची
पुढील दिशा भरकटवणारा आहे. कारण, मराठा
समाज संयम राखत एकत्र येतो, ते
सुद्धा पदरचे पैसे खर्च करून आणि समाजाचे एकत्रिकरण दाखविण्यासाठी वेळ देतो हिच खरी
क्रांती आहे.
Subscribe to:
Posts (Atom)





