१ जुलै २०१६ पासून रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चा उपप्रांतपाल म्हणून मी जबाबदारी सांभाळली आहे. रोटरीच्या या डिस्ट्रिक्टमध्ये नाशिकपासून तर गोंदिया (विदर्भ) पर्यंतचे जिल्हे समाविष्ट आहेत. यात १०० रोटरी क्लब असून वर्धा येथील प्रांतपाल श्री. महेश मोकालकर यांच्या नेतृत्वात २२ उपप्रांतपाल काम करीत आहेत. माझ्याकडे जळगाव शहरातील गोल्डसिटी, मिडटाऊन आणि जळगाव वेस्टसह अमळनेर क्लब, भुसावळ रेलसिटी अशा पाच क्लबची जबाबदारी आहे.
साधारणपणे सहा
महिन्यांपूर्वी श्री. मोकालकर यांनी माझ्याशी संपर्क करून उपप्रांतपाल पदाची
जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली होती. तेव्हा मी ती स्वीकारण्याच्या
मनःस्थितीत नव्हतो. कारण, इतर
रोटरी क्लबच्या कार्यातही सहभागी व्हावे लागेल, भरपूर वेळ द्यावा लागेल असे मला वाटले. पण श्री. मोकालकर यांनी
कामाचे महत्व समजावलयानंतर मी जबाबदारी स्वीकारायला तयार झालो. त्यानंतर
फेब्रुवारी २०१६ मध्ये आमची एजीटीएस दुबईत झाली. हे एक प्रकारचे प्रशिक्षण असते.
प्रांतपाल आणि त्यांच्यासोबत उपप्रांतपाल म्हणून काम करणारे सर्वजण त्यात सहभागी
झाले. अशा प्रकारच्या सहभागातून रोटरीचे विभिन्न भागातील पदाधिकारी एकत्र येतात.
आपापसात बोलतात. विचारांची देवाण घेवाण करतात. सोबत काम करताना काय करायचे आहे ? ते समजून घेतात. आमचे दुबईतील प्रशिक्षण उत्साहात
झाले. ते कमालीचे यशस्वी ठरले.
तेथील चर्चेत काही
महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. यंदा रोटरी उपप्रांतपाल, क्लब अध्यक्ष, सचिव
यांच्यासाठी खास जॅकेट कोड ठरविण्यात आला आहे. त्यामुळं छान टीम स्पिरीट जाणवते. तसेच
श्री. मोकालकर यांच्या नेतृत्वातील एक नवाट्रेंड म्हणजे प्रत्येक प्रशिक्षण शिबीर
वा डिस्ट्रीक्ट इव्हेंटला स्वप्नांच्या थिमचं दिलेल नाव. जसे दुबईतील
"स्वप्नाकार", वर्धा येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्याला "स्वप्न
संकेत " नाव दिले होते. जानेवारी महिन्यात होणारी कॉन्फरन्स "स्वप्नपुर्ती"
असेल. मी देखील या “स्वप्नपुर्ती” यात्रेत
एकदिलाने सामिल व्हायचे नक्की ठरविले आहे.
रोटरीचे कार्य हे
प्रामुख्याने तीन स्तरांवर चालते. त्यात आंतराष्ट्रीयस्तरावरील समाज ऊपयोगी ऊपक्रम
व प्रांत स्तरावरील ऊपक्रम तसेच स्थानिक
क्लबचे ऊपक्रम असतात. त्या संदर्भातील कार्याची दिशाही आम्ही निश्चित केली आहे.
रोटरीने सध्या जगातील साक्षरतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. पुढील १० वर्षांत जगात
१०० टक्के साक्षरता उद्दिष्ट गाठण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. रोटरी जेव्हा एखादे
उद्दिष्ट ठरविते तेव्हा ते साध्य करते. याचे उदाहरण पोलिओ निर्मूलन अभियान आहे.
रोटरीच्या मदतीने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या पल्स पोलिओ मोहिमांमुळे संपूर्ण
जग आज पोलिओमुक्त झाले आहे. त्याच पद्धतीने आता रोटरी जगाला १०० टक्के साक्षर करणार
आहे.
प्रांतस्तरावर जलयुक्त
शिवार अभियान राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून
महाराष्ट्रात पाणी अडवा पाणी जिरवा, नदी-नाला
खोलिकरण, तलाव दुरूस्ती वगैरे कामे
लोकसहभागातून घेतली जातील. या मागचा हेतू असा आहे की, ग्रामीण भागात जास्तीत जास्त वॉटरशेड तयार करून आसपासच्या
शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा. श्री. मोकालकरजींचे स्वप्न आहे की, रोटरी वर्ष
२०१६-१७ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न व्हावेत. यासाठी
भरकस काम करण्यास आम्ही इतर पदाधिकारी तया आहोत.
या कार्यात रोटरी क्लब
यंत्रणा गरजेनुसार निधी खर्च करणार आहे. या संदर्भातील प्रांतपाल मोकालकर यांनी
सुरू केलेले प्रयत्न वाखणण्यासारखे आहेत. वर्धा येथे त्यांचा पदग्रहण कार्यक्रम
झाला तेव्हा मी गेलो होतो. त्या कार्यक्रमास माजीमंत्री तथा विदर्भातील
शिक्षणसम्राट दत्ताजी मेघे उपस्थित होते. मेघेंनी रोटरीसाठी मेजर डोनरची भूमिका
निभावत ५ कोटींची देणगी जाहीर केली.अशा प्रकारच्या देणगीतून रोटरी ३०३० मधे बरीचशी
समाज उपयुक्त कामे होणार आहेत.
रोटरीच्या संदर्भात एक
मुद्दा स्पष्ट करायला हवा. रोटरीचा कोणताही निधी हा आपापसात देणगी गोळा करून उभा
केला जातो. रोटरीच्या कोणत्याही उपक्रमाला जाणारे पदाधिकारी हे स्वतःच्या खर्चाने
जातात. त्यासाठी क्लबचा खर्च वगैरे काहीही नसते. रोटरीचे सभासदत्वही कोणालाही
उपलब्ध होत नाही. रोटरीचे सदस्य होण्यासाठी आमंत्रण दिले जाते. ते देण्यापूर्वी
त्या व्यक्तीची परिपूर्ण माहिती घेतली जाते. सामाजिक, आर्थिकस्तर याविषयी क्लबमध्ये चर्चा होवून मंजुरी दिली जाते.
त्यानंतर तीन बैठकांना संबंधित सदस्याला बोलावून त्याचेही मत, वागणूक पाहिली जाते. त्यानंतर रोटरीचे सदस्यत्व
पुढे सुरू राहते. रोटरीचा प्रत्येक सदस्य हा स्वतःच्या उद्योग, व्यवसाय, सेवा,
नोकरीत पद, पत व प्रतिष्ठा बाळगून असतो. रोटरीचे पदाधिकारी असलेल्या
व्यक्तीस समाजात वेगळी प्रतिष्ठा व सन्मान मिळतो.
रोटरीच्या आमच्या टीमने
आगामी वर्षभरात काही नवे स्थानिक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यात जळगाव
शहरातील मेहरूण भागातील स्मशानभूमिजवळ विसावा बांधणे, टीच ऍण्ड विन उपक्रमात शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे निर्माण ,
पोस्टर व संवाद यादवारे विद्यार्थींचे
व्यक्तिगत स्वच्छतेबाबत उद्बोधन, ई
लर्निंग कीटस्चे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना
सायकल वाटप, शिवण मशीन वाटप, हेल्थ चेक अप कॅम्पस्, मोतीबिंदू शस्रक्रिया असेही उपक्रम होतील. याशिवाय मेगा
प्रोजेक्ट म्हणून आम्ही डायलेसिस सेंटर,
स्किन बॅंक सुरू
करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
व्यक्तीगत स्वरुपात मी
काही कामे करण्याचे ठरविले आहे. त्यात नेरी नाकाजवळील स्मशानभुमीजवळ तयार केलेल्या
विसावा जवळील परिसरात दुचाकी वाहने लावल्याने होणारा अडथळा दुर करण्यासाठी
बंदोबस्त करणे, जास्तीत जास्त मेजर डोनर
बनविणे, सामान्य जनतेला साधारण आजारांवरील
उपचारासाठी सरकारी आरोग्य यंत्रणेचा उपयोग घ्यावा या बाबत प्रबोधन करणे, कोपरापासुन हात गमावलेल्यांना वापर करता येईल असा
कृत्रिम हात मोफत मिळवून देणे तसेच "रोटो स्पोटर्स " या प्रांतस्तरावरील
सांस्कृतिक व खेळांचा स्पर्धांच यावर्षी जळगावात आयोजन करणे....
आता जवळपास सर्व क्लबचे
पदग्रहण कार्यक्रम आटोपत आले आहेत. लवकरात लवकर आम्ही आमच्या लक्ष्य व
उद्दिष्टांवर काम सुरू करीत आहोत. वर्षभराच्या अखेरीस निश्चितपणे समाधानकारक कार्य
आमच्या टीमकडून घडलेले असेल असा मला विश्वास आहे.
जय रोटरी ...






No comments:
Post a Comment